खान्देश

भडगाव व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणी घोषित तालुका अध्यक्षपदी अशोक परदेशी, शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे यांची निवड.

भडगाव व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणी घोषित

तालुका अध्यक्षपदी अशोक परदेशी, शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे यांची निवड.

भडगाव – शहरातील शासकीय विश्रामगृहात ४ जानेवारी रोजी व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची बैठक घेण्यात आली. यामध्ये भडगाव तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात तालुकाध्यक्षपदी अशोक परदेशी यांची तर सर अध्यक्ष म्हणून संजीव शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

ही बैठक जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीची सुरुवात संघटनेचे ध्येय व उद्दिष्टे, कार्याची संपूर्ण माहितीने करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवावी, याच अनुषंगाने भडगाव तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुखपदी विठ्ठल मराठे, जिल्हा संघटकपदी संजय महाजन, भडगाव तालुका अध्यक्षपदी अशोक परदेशी, तालुका उपाध्यक्षपदी विलास पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी संजय सोनार, तालुका कोषाध्यक्षपदी संजय कोतकर, तालुका सचिवपदी नरेंद्र भोसले, तालुका संपर्कप्रमुखपदी निलेश पाटील, तालुका संघटकपदी अमिन पिंजारी, तालुका सहसंघटकपदी पंकज पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच शहर कार्यकारणीमध्ये शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे, शहर उपाध्यक्षपदी गणेश पाटील, शहर कार्याध्यक्षपदी गणेश अहिरे, सदस्यपदी रवींद्र पाटील, सल्लागारपदी शिवदास महाजन, आत्माराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित तालुका शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button