खान्देश

साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्रॉली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू . तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश !

साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्रॉली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सातारा. साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या कारंडवाडी गावातील सात-आठ महिला शेतात गेल्या होत्या. सायंकाळी अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी यायला निघाल्य कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनॉल शेजारून ट्रॅक्टर येत असताना एका वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळली. या दुर्घटनेत चार महिलांचा बुडून मृत्यू झाला. कारंडवाडी गावातील चार महिलांच्या अपघाती मृत्युने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (५५), अरुणा शंकर साळुंखे (५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (६५, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) या महिलांचा कॅनालमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अन्य दोन महिलांवर उपचार सुरू आहेत. दोन महिला बचावल्या या दुर्घटनेत दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनॉलमधून बाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील चार महिला बुडाल्याचे समजताच कारंडवाडीतील नागरिक, महिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. चारही महिलांचे मृतदेह कॅनॉलमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button