खान्देश

पाचोरा रोटरी क्लब च्या उपक्रमात 67 कुपोषित बालकांची तपासणी !

पाचोरा रोटरी क्लब च्या उपक्रमात 67 कुपोषित बालकांची तपासणी !

पाचोरा – येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत काल दिनांक 20 डिसेंबर शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे कुपोषित बालकांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 67 बालकांची तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आले. व त्यांच्या सकस आहाराबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

रोटरी क्लबच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी केले. याप्रसंगी सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. किशोर पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, बालरोगतज्ञ डॉ. राहुल पटवारी, डॉ. वैशाली शिरसाठ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. लोकेश सोनवणे, डॉ. शितल वाघ उपस्थित होते.
तालुक्याच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जिजाबाई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कुपोषित बालक तपासणी शिबिर प्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य रो. चंद्रकांत लोढाया, रो. निलेश कोटेचा, डॉ. मुकेश तेली, रो. डॉ. अजयसिंग परदेशी, रो. डॉ. गोरख महाजन, रो. डॉ. अमोल जाधव, रो. प्रदीप बापू पाटील, रो. रुपेश शिंदे, डॉ. बाळकृष्ण पाटील गिरीश दुसाने तसेच ग्रामीण रुग्णालयाचे फार्मासिस्ट दगडू वाघ, श्रीकांत महाजन, कविता गायकवाड, मनीषा पवार उपस्थित होते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक यांनी उपस्थित पालकांना बालकांच्या आहार , विहार व व्यायाम याबद्दल मार्गदर्शन केले. तर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांचे समयोचित भाषण झाले. या शिबिराला महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे सहकार्य लाभले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button