खान्देश

सार्वे पिंप्री येथे युवकांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले मार्गदर्शन…!

सार्वे पिंप्री येथे युवकांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले मार्गदर्शन…!

पाचोरा:- शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी सार्वे पिंप्री गावातील स्वामी समर्थ मंदिरात गावातील मुला मुलींना मार्गदर्शन केले. गोंडगाव येथील घटनेचा निषेध करून उपस्थित पालकांना, ग्रामस्थांना आपल्या पाल्यांवर मूल्य रुजवण्यासाठी, योग्य ते संस्कार करण्यासाठी,मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकमेकांमध्ये सुसंवाद असण्याची आवश्यकता आहे‌.आपल्या पाल्यांसोबत सुसंवाद करणे आवश्यक आहे व त्यांना मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असे नमूद केले.श्री स्वामी समर्थांच्या आरतीचा लाभ देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला.याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेंद्र वाघमारे उपस्थित होते.गावातील ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button