खान्देश
जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ कठोर कारवाईसाठी डॉ.निळकंठ पाटील यांचे पाचोरा पोलीस निरीक्षकांना निवेदन !

जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ कठोर कारवाईसाठी डॉ.निळकंठ पाटील यांचे पाचोरा पोलीस निरीक्षकांना निवेदन !
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथे जितेंद्र आव्हाड याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी डॉ निळकंठ पाटील यांचे पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन निवेदनात असे म्हटले आहे कि वाचाळवीर राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यानी पुन्हा आपल्या अकलेचे तारे तोडले आपल्या देशाचे आराध्यदैवत प्रभु श्री रामचंद्र यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापल्या त्यामुळे समस्त हिन्दु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या अशा वाचाळविरांन वर लवकरात लवकरच कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात येवून कारवाईची मागणी केली .




