पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात कोणी घेतली माघार तर कोण आहे रिंगणात !

पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात कोणी घेतली माघार तर कोण आहे रिंगणात !
पाचोरा (प्रतिनिधी) – राज्यात विधानसभा निवडणूक उमदेवार माघारीचा शेवटचा दिवस होता, पाचोरा विधानसभा मतदार संघात एकूण चोवीस उमदेवारी अर्ज दाखल झाले होते, पाचोरा विधानसभा निवडणूक आयोग यादी प्रमाणे आज बारा उमदेवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
पाचोरा विधानसभा मतदार संघात एकूण चोवीस उमदेवारी अर्जा पैकी हे बारा उमेदवार माघारी घेतली उत्तमराव धना महाजन, अफसर अकबर तडवी, नरेद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी, नीतीन नामदेव पाटील, श्रीमती पूजा अमोल शिंदे, संजय ओंकार वाघ, विजय नरहर पाटिल, सचिन अशोक सोमवंशी, शेख राजु शेख सलीम, साबीर खान शब्बीर खान, संदिप फकीरा जाधव, हरिभाऊ तुकाराम पाटील या उमेदवारांनी माघारी घेतली आहे.
शिवसेना पक्षातुन किशोर धनसिंग पाटील निशाणी धनुष्यबाण, श्रीमती वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल असून, बसपा पक्षातुन सतिष अर्जुन बिन्हाडे यांची निशानी हत्ती, अमित मानखाँ तडवी वंचित बहुजन आघाडी यांची निशाणी गॅस सिलेंडर, प्रताप हरी पाटील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असून निशाणी सप्त किरणांसह पेनाची निभ आहे.
बहुजन महापार्टीचे मांगो पुंडलिक पगारे यांची निशाणी कैरम बोर्ड, अपक्ष अमोल पंडीतराव शिंदे निशाणी गन्ना किसान, अमोल शांताराम शिदे निशाणी – रोड रोलर, अपक्ष निळकंठ नरहर पाटील निशाणी – बॅट, अपक्ष मनोहर आण्णा ससाणे निशाणी – नागरिक, अपक्ष दिलीप ओंकार वाघ निशाणी – शिट्टी, अपक्ष श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी (निशाणी ऑटो रिक्षा) या उमदेवारांमध्ये राहणार काटेकी टक्कर.



