विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत 2077 शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी घेतले प्रशिक्षण !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत 2077 शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी घेतले प्रशिक्षण !
पाचोरा – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. सदर कार्यक्रमाप्रमाणे दिनांक-20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. याकामी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी,जळगांव यांचे आदेशानुसार तालूक्यातील मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी या पदी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नेमणुक करणेत आलेली आहे.
विधानसभा निवडणूकामी नियुक्त केलेल्या 2077 अधिकारी /कर्मचारी यांचे निवडणूकीचे कामकाज करणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक-27/10/2024 रविवार रोजी पाचोरा शहरातील MAIDC गोडावुन खत कारखाना गिरड, रोड पाचोरा येथे दोन सत्रात मौखिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा विस्तृत स्वरुपात चित्रफितीव्दारे त्याचे सादरीकरण करुन पार पडला तर दुसरा टप्पयात EVM मशीन हाताळणे (Handson Training) चे प्रशिक्षण हे गो.से.हायस्कुल,पाचोरा या ठिकाणी आयोजित करण्यात आले.सदरच्या प्रशिक्षणात भूषण अहिरे , निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी. पाचोरा भाग पाचोरा तसेच. विजय बनसोडे व शितल सोलाट , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा /भडगांव यांनी मार्गदर्शन केले.सकाळच्या पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात एकुण 876 अधिकारी /कर्मचारी यांचेपैकी 857 अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले. तर 19 अधिकारी/ कर्मचारी हे गैरहजर होते, दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात एकुण एकुण 1201 अधिकारी /कर्मचारी यांचेपैकी 1180 अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले तर 21 अधिकारी/ कर्मचारी हे गैरहजर होते. गैरहजर असलेल्या एकुण 40 अधिकारी / कर्मचारी यांना प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.प्रशिक्षणा नंतर नियुक्त केलेलया सर्व अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक संदर्भात 30 गुणांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्नांवर परिक्षा घेण्यात आली.या प्रसंगी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा श्री. भूषण अहिरे , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा श्री. विजय बनसोडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार,भडगांव श शितल सोलाट , निवडणूक नायब तहसिलदार, पाचोरा व भडगांव , महसुल नायब तहसिलदार, पाचोरा व भडगांव , सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, व निवडणूकामी नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.



