खान्देश

लोहारा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !

लोहारा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी!

भारत पाटील (म्हसास प्रतिनिधी)
दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ.जे.जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे 2 ऑक्टोबर 2024 हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक आर के सुरवाडे  होते सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे  यांच्या हस्ते भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक वाय पी वानखेडे यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिली यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगते सादर केली तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आर के सुरवाडे सर यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयीची माहिती उपस्थितांना करून दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक बी एन पाटील यांनी केले व आभार पी.यु.खरे  यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button