खान्देश

पाचोरा पोलीस ठाणे तर्फे गणपती मंडळाचे परीक्षण

पाचोरा पोलीस ठाणे तर्फे गणपती मंडळाचे परीक्षण

पाचोरा- जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतील 20 गणपती मंडळाचे प्राथमिक परीक्षण काल दिनांक 14 रोजी करण्यात आले. या प्राथमिक परीक्षणात गणपती मंडळाची अधिकृत नोंदणी, अधिकृत वीज जोडणी, देखावा, उत्सवातून दिले जाणारे प्रबोधनात्मक संदेश, शिस्त, स्वच्छता, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा, गणपती मूर्तीची उंची यासह अन्य निकष तपासण्यात आले. या प्राथमिक निरीक्षणानंतर विसर्जन मिरवणुकीत अंतिम निरीक्षण व गुणदान करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस दलातर्फे दरवर्षी गणपती मंडळांना प्रोत्साहन पर बक्षिसे दिली जातात. प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत तीन गणपती मंडळांची निवड होते. त्यातून जिल्ह्यातील आदर्श गणपती मंडळांची निवड केली जाते. यावर्षी पाचोरा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण 20 मंडळे स्पर्धेत आहेत. उपविभागीय पोलीस अधीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे समवेत पाचोरा पोलीस ठाणे अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव परीक्षण समिती सदस्य प्रा. सी. एन. चौधरी, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. स्वप्नील पाटील, माजी नगराध्यक्ष विष्णू बापू सोनार, आणि ॲड.कविता रायसाकडा यांनी गणपती आरास चे परीक्षण केले. निरीक्षण पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील,पोलीस कर्मचारी गजानन काळे, सुनील पाटील, दीपक पाटील , होमगार्ड कपिल पाटील उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button