खान्देश

महिला सक्षमीकरणाचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मंत्र हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं – डॉ. नीलकंठ पाटील

महिला सक्षमीकरणाचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मंत्र हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं – डॉ. नीलकंठ पाटील

पाचोरा : महिला सक्षमीकरणाचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं, असे विचार पाचोरा येथील नामांकित वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ.

नीलकंठ पाटील यांनी व्यक्त केले. दैवयोग मंगल कार्यालयात रविवारी दुपारी वृंदावन हॉस्पिटलच्या सौजन्याने महिला सबलीकरण म `ळावा घेण्यात आला. या मेळाव्यास महिलांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दन सर्वांचे लक्ष वेधले. या मेळाव्यात डॉ. नीलकंठ पाटील यांनी उपस्थित महिला वर्गास संबोधित केले. यावेळी महिला सक्षम , लाडकी बहीण योजनेवर डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ता मीनाक्षी निकम (चाळीसगाव) उपस्थित होत्या. त्यांचा डॉ. नीळकंठ पाटील यांनी सत्कार केला. आज देश विश्व गुरुपदी वाटचाल करताना दिसतोय, यात महिलांची भूमिका आदी विषयावर मीनाक्षी निकम यांनी मार्गदर्शन केले.

गरुवर्य आई, अनुलोम संस्थेचे दत्ताजी नाईक यांनीही उपस्थित मातृशक्तीला देव, देश, धर्म, याविषयी महिलांची भूमिका काय असली पाहिजे. याविषयी सामाजिक संदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते विकास लोहार यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली. रिक्षाचालक आशाताई भुजंग, कळसरा येथील कांताबाई संभाजी चौधरी यांनी एकरी २३ क्विंटल कापूस दादा लाड तंत्र वापरून विक्रमी उत्पन्न घेतले, यांना मा साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

सरचिटणीस, जि.प. सदस्य मधुकर काटे यांचा डॉ. नीळकंठ पाटील यांनी सत्कार केला. भाजप माजी महिला आघाडीच्या साधना देशमुख यांचा सत्कार, अर्चना पाटील यांनी केला.

उद्योजक वैशाली काबरा, स्वाती कुलकर्णी, वनवासी कल्याणाश्रम सामाजिक कार्यकर्त्या स्मिता सराफ उपस्थित होत्या. सरूबाई धुमाळ या ९५ वर्षांच्या आजीने डॉ. नीळकंठ पाटील यांचा सत्कार करून आशीर्वाद दिले. मेळाव्यास पाचोरा शहरासह मतदारसंघातील महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या. ही मातृशक्ती आजपावेतो डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्य सेवेचे दर्शन घडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button