खान्देश

राजकोट किल्ल्यावरील अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा त्वरित विराजमान करून दोषींवर कारवाई करा : भडगांव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची मागणी…!

राजकोट किल्ल्यावरील अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा त्वरित विराजमान करून दोषींवर कारवाई करा : भडगांव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची मागणी…!
भडगांव (प्रतिनिधी) : मालवणच्या समुद्र किनारी राजकोट किल्ल्यावर उभारलेला अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा काल सोमवारी कोसळला. दि. ०४ डिसेंबर २०२३ रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. मात्र आठ महिन्यातच पुतळा कोसळून जमीनदोस्त झाला. नौदलाने डिझाईन केलेला या पुतळ्यास कणकवलीच्या बांधकाम खात्याने पाच कोटी निधी दिला होता. मात्र गुणवत्तेनुसार दर्जेदार उभारणी झाली नसल्याने पुतळा कोसळला. त्यामुळे समस्त शिवप्रेमींनी भावना दुखावल्या गेल्या आहेत. निष्कृठ काम करणारे ठेकेदार व संबधित दोषींवर त्वरीत कठोर करावी आणि लवकरात लवकर नवीन गुणवत्तापूर्ण पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा विधिवत व सन्मानपूर्वक उभारण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निषेधवजा निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, तालुका प्रमुख जे. के. पाटील, महीला तालुका प्रमुख माजी नगरसेविका योजना पाटील, गायत्री पाटील, रेखा शिरसाठ, सुरेखा वाघ, जिजाबाई चव्हाण, मनीषा पाटील, निता भांडारकर, बेबाबाई पाटील, वैशाली पाटील, शितल पाटील, मिनाक्षी पाटील, रुपाबाई पाटील, रंजना महाजन, अरुणा पाटील, शाहीस्ता शाह, नरेंद्र पाटील, नवल राजपूत आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सी. पी. पालकर यांना दिले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button