खान्देशजळगांव जिल्हा

आईच्या अस्थी विसर्जन न करता राखेत शेतात पेरुचे झाड लावून दिला अनोखा संदेश अस्थी विसर्जनाला तिलांजली. झाडाची मिळेल सावली अन फळांचा गोडवा!

भडगाव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे)-*आईच्या अस्थी विसर्जन न करता राखेत शेतात पेरुचे झाड लावून दिला अनोखा संदेश
अस्थी विसर्जनाला तिलांजली.
झाडाची मिळेल सावली अन फळांचा गोडवाव
तालुक्यातील
महिंदळे येथील पत्रकार भास्कर पाटील यांच्या आई सिंधूबाई शेनपडू पाटील वय ७५ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.निधन झाले म्हणजे रितिरिवाजानुसार सर्वच विधी पार पडावे लागतात.निधनाच्या तिसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन करतात. परंतु भास्कर पाटील यांनी या प्रथेला तिलांजली देत पर्यावरण पूरक पायंडा पडलाआहे. त्यांनी आईच्या अस्थी राखेसह पाण्यात विसर्जन न करता आपल्या शेतात खड्डा खोदून अस्थी त्यात बुजून त्या जागेवर पेरुचे झाड लावलेआहे . हे पेरुचे झाड परीवाराला सावलीही देईल आणि गोड पेरुचा गोडवाही देईल. आईच्या नावाने या परीवाराला या झाडाच्या रुपाने आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्यांच्या या अनोख्या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.
जुन्या रूढी परंपरांना तिलाजली.
ग्रामीण भाग असो कि शहरी भाग कुणाचेही निधन झाले म्हणजे जुन्या रूढी परंपरेनुसार सर्व कार्यक्रम करावे लागतात त्यातीलच अस्थी विसर्जन निधनाच्या तिसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन कार्यक्रम असतो. या दिवशी अस्थी एकत्र करून त्या नदीत किंवा संगमच्या ठिकाणी विसर्जित करण्याची प्रथा आहे. परंतु यामुळे पाणीही दूषित होते व पर्यावणाचा ऱ्हास होतो. अनेक ठिकाणी कमी पाण्यातही अस्थी विसर्जन करावे लागते. कमी पाणी असल्यामुळे ते दूषित असते त्याच पाण्यात त्या अस्थी टाकून मोकळे होतात. त्या आत्म्याचा शेवटी चांगल्या पाण्यात होत नाही. या सर्व बाबींचा विचार करता अस्थी विसर्जन न करता त्या मृत व्यक्तीची कायमस्वरूपी आठवण म्हणून अस्थी शेतात पुरून त्या जागेवर झाड लावले. या नवीन उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया —
आपल्या घरातील कितीही जवळच्या व्यक्तीचे निधन झाले. तरी त्यांची आठवण हि काही काळापर्यंत असते. म्हणून आईची आठवण चिरकाल राहील या उद्देशाने नी जुन्या रूढी परंपरांना तिलांजली देत. अस्थीसह राख शेतात बुजून त्या जागी एक पेरूचे झाड लावले. त्या झाडाकडे पाहून आई स्मरणात राहील. व सर्व नागरिकांनी असे एक एक झाड लावले तर वृक्ष सवर्धनही होईल व आपले नातलग कायम स्मरणातही राहतील.
भास्कर पाटील पत्रकार. महिंदळे. ता. भडगाव. जि. जळगाव.
फोटो — महिंदळे येथे पञकार भास्कर पाटील यांचे आईच्या अस्थि व राखेत पेरुचे झाड लावतांना उपस्थित नातवाईक मंडळी.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button