खान्देश

संजय गांधी निराधार योजना अनुदान त्वरित मिळावे : माजी अध्यक्षा योजना पाटील यांची मागणी

संजय गांधी निराधार योजना अनुदान त्वरित मिळावे : माजी अध्यक्षा योजना पाटील यांची मागणी

भडगांव : (प्रतिनिधी) संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान गेल्या तिन महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही. निराधार व दुर्बल घटकांसाठी या योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती योजना, दिव्यांग योजना इत्यादी लाभार्थ्यांना डीबीटी योजनाद्वारे थेट खात्यात मासिक अनुदान जमा केले जाते. त्यासाठी म. तहसिलदार, म. तलाटी व संबधित शाखेने लाभार्थ्यांना आधार कार्ड व बँक पासबुक बाबत सहकार्य करावे आणि अनुदान त्वरित मिळावे अशा आशयाचे निवेदन संजय गांधी निराधार योजना मा. अध्यक्षा योजना पाटील यांनी निवासी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे यांना निराधारांसमवेत दिले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button