खान्देश

आर्थिक फसवणुक करून लग्न लावुन देणारी अंतराज्यीय टोळी कासोदा पलिासाकडुन जेरबंद !

कासोदा (प्रतिनिधी) – पोलीस स्टेशन परीसर तसेच जिल्ह्यात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजु व त्यांच्याशी मध्यस्तां मार्फत संपर्क करुन लग्नासाठी मुली दाखविले जातात नंतर 2 ते 5 लाख रुपये पर त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या मुलींशी लग्न लावुन दिले जाते. सदर मुली लग्ना नंतर चांगला संसार करतात व विश्वास संपादन करुन घरातुन पैसे, सोने चोरुन पळुन जातात अशी टोळी (रॅ सक्रीय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत माहीती प्राप्त करून सदर प्रकार उघड कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांने दिलेल्या फिर्यादी नुसार यातील महिला आरोपी नामे 1) मोना दादा 25 वर्षे 2) सरस्वती सोनु मगराज, वय-28 वर्षे दोन्ही रा. रायपुर (राज्य-छत्तीसगड), 3) अश्वीनी अरुण थोरात25 वर्ष 2) सरस्वता सानु मगराज, वय-28 वर्ष दान्हा रा. रायपुर (राज्य-छत्तीसगड), 3) अश्वाना अरुण थारात वय-26 वर्ष रा. पांढुरना (मध्यप्रदेश) अशा तिघींचे कासोदा गावांतील तिन तरूणांसोबत आ.क्र.4) सरलाबाई अनिल पाटील, वय-60 वर्षे 5) उषाबाई गोपाल विसपुते, वय-50 वर्षे दोन्ही नादेड ता.धरणगाव जिल्हा जळगांव यांनी दि.16/04/2024 रोजी लग्न लावुन दिलेले होते. यातील एका आरोपी हीने कबुल केले की, आम्हीं तिघींचे यापुर्वी लग्न झालेले असुन आम्हांला मुले आहेत व आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करणे साठी घरुन महाराष्ट्रात आलेलो आहोत.
फिर्यादी व त्यांचे दोन साथीदार अशांना एजंट महिला आरोपी क्रमांक-4) सरलाबाई अनिल पाटील, 5) उषाबाई गोपाल विसपुते दोघे रा. नांदेड ता. धरणगांव यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेवुन व त्यांच्याशी लग्न लावुन देण्याचे आमिष दाखवुन वेळोवेळी संपर्क करून, खोटे सांगुन लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या घरांच्याकडुन एकत्रीत 4,13,000/- रुपये उकळले वरील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांचे यापुर्वी लग्न झालेले असुन सुध्दा त्यांनी ती माहिती लपवुन फिर्यादीची व त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणुक केली.
सदर आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपुत, सफौ/1499 रविंद्र पाटील, सफौ/516 मनोज पाटील, पोहेकॉ/698 राकेश खोंडे, पोना/3112 किरण गाडीलोहार, पोकॉ/1736 इम्रान पठाण, पोकॉ/ 1609 जितेश पाटील, पोकाँ/582 नितिन पाटील, मपोकाँ/2045 सविता पाटील अशा पथकाने कारवाई केली.
जळगांव पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे की अशा फसवणुक करुन विवाह लावणाऱ्या टोळ्यांच्या भुलथापांना बळी न पळता खात्री करुनच लग्ना बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व अशा फसवणुक करण्याऱ्या टोळ्या सक्रिय असल्यास पोलीसांशी संपर्क करावा.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button