खान्देश

महसुल विभागातर्फे मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रॅलीचे आयोजन !

महसुल विभागातर्फे मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रॅलीचे आयोजन !

पाचोरा (डॉ.योगेश पाटील)- लोकसभा मतदार संघांतर्गत 18 पाचोरा रोजी निवडणूक विभाग भागाचे सुमारे 300 ते 350 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार 03 जळगांव लोकसभा म विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणेकामी आज दिनांक 03 एप्रिल 20 उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांनी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये सर्व अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले. तसेच मतदारामध्ये मतदानाची जनजागृती करणेकामी भव्य सायकल रॅलीचे सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एम. एम. कॉलेज, भडगांव रोड, पाचोरा येथ पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

मतदान जनजागृतीकामी ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून महिला अॅटो रिक्षा चालक श्रीमती, आशा दगडू भुजंगे रा. नागसेन नगर, पाचोरा यांचा देखील सहभाग नोंदविण्यात आला असुन जनजागृती रॅलीत महसूल विभागातील  प्रविण चव्हाणके (तहसिलदार पाचोरा) , विजय बनसोडे, (तहसिलदार भडगांव) सुभाष कुंभार (नायब तहसिलदार) उ. वि. अ. कार्यालय पाचोरा, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी व शिपाई कर्मचारी नगरपालिका विभागातील, मुख्याधिकारी, उप मुख्याधिकारी, पंचायत समिती, पाचोरा, गट विकास अधिकारी, शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभाग यांनी देखील सहभाग नोंदविण्यात आलेला होता. रॅलीची सांगता एम. एम. कॉलेज बाऊंड, भडगांव रोड पाचोरा येथे भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा.यांनी आपल्या भाषणातून मतदार जागृती , व मतदानाचे महत्व पटवत टक्केवारी कशी वाढेल हे सांगितले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button