जळगांव जिल्हा

माऊली फाउंडेशन तर्फे आशा स्वयंसेविकांसाठी कर्करोग तपासणी शिबिर संपन्न 

*भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे)- माऊली फाउंडेशन तर्फे आशा स्वयंसेविकांसाठी कर्करोग तपासणी शिबिर संपन्न*

 

माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्यावतीने भडगावसह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन माऊली फाऊंडेशनच्या वतीने अंजली हाँस्पिटलमध्ये आशा स्वयंसेविकांसाठी “कर्करोग तपासणी शिबिर” आयोजित करण्यात आले होते.

ग्रामीण व शहरी भागात तळागाळातील लोकांचे आरोग्य सांभाळण्याचे काम आशा स्वयंसेविका नेहमीच करत असतात. अशा अशा स्वयंसेवकांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्यासाठी फाउंडेशन च्या वतीने मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आशा स्वयंसेवकांची तपासणी केल्यानंतर त्यांनीही महिलांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग या आजाराविषयी सामान्य महिलांमध्ये जनजागृती करावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांच्या “आय बी ई” आणि “वी आय ए” ह्या एकूण १६३ कॅन्सरविषयक तपासण्या करण्यात आल्या .

उदघाट्न प्रसंगी कर्करोगाविषयी अधिक माहिती देतांना डाँ.प्रतिक भोसले यांनी सांगितले की, सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहेत. त्यांत महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये कर्करोग वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महिलावर्ग याबाबतीत लक्ष देत नाही. कर्करोग आजाराविषयी महिलांमध्ये जनजागृती होऊन महिलांनी याबाबतीत सजग राहुन लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन डाँ.भोसले यांनी केले.

 

सदर शिबिराला फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर भाऊ सूर्यवंशी यांचे विशेष योगदान व उपस्थिती लाभली. शिबिरासाठी पुणे येथील समवेदना संस्थेच्या डाँ. प्रज्ञा राजदीप, डॉ माधवी राऊत व डॉ आरती लोयरे यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिराचे समन्वयक म्हणून योगेश शिंपी यांनी काम पाहिले.

कार्यक्रमप्रसंगी माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, संचालिका संगिता जाधव,पिंपरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रतिक भोसले, माऊली फाऊंडेशनचे सर्व स्वयंसेवक तसेच भडगाव येथील अनेक आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button