खान्देश

पाचोरा येथील सुवर्णकार मंडळातर्फे श्री संत नरहर महाराज पुण्यतिथी टाळ मृदंगाच्या तालावर उत्साहात साजरी

पाचोरा येथील सुवर्णकार मंडळातर्फे श्री संत नरहर महाराज पुण्यतिथी टाळ मृदंगाच्या तालावर उत्साहात साजरी !

पाचोरा प्रतिनिधी- अनिल आबा येवले पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळ व नवयुवक सुवर्णकार मंडळ यांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नरहर महाराज यांची पुण्यतिथी उत्साहाने व आनंदाने अहिर सुवर्णकार कार्यालय येथून काढून हिंद ऑइल मिल रोड जामनेर रोड विठ्ठल मंदिर रोड रथ गल्ली गांधी चौक कोळी गल्ली सोनार गल्ली देशमुख वाडी येथून श्री संत नगर महाराज यांची भव्य पालखीचे मिरवणूक काढून प्रत्येक घरोघरी पूजन करण्यात आले तसेच सोनार गल्ली येथील गणपती मंदिरात श्री संत नरहर महाराजांचे आरती व पूजन करण्यात आले यावेळी सोनार समाजातील ज्येष्ठ तरुण व महिलावर्ग प्रत्येक घरातून सर्वजण उपस्थित होते त्यामुळे यावेळी सोनार समाजात अत्यंत आनंदमय वातावरण होऊन सर्वांनी श्री संत नरहर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पालखीच्या मिरवणुकीला सामील होऊन आनंद घेतला कार्यक्रमाचा समारोप अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय येथे सोनार समाजातील सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहिर सुवर्णकार मंडळ व नवयुवक सोनार समाज मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button