
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बीबी का मकबरा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
भडगाव -प्रतिनिधि -(संजय शेवाळे) -जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बीबी का मकबरा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगरदेवळा सूतगिरणी, इंदिरानगर,वडगाव बुद्रुक या शाळांची माझी शाळा माझा उपक्रम या सह शालेय उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कालीमठ,वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर,जनार्दन स्वामी समाधी स्थळ, खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर,दौलताबादचा किल्ला व संभाजीनगर येथे बीबी का मकबरा,प्राणी संग्रहालय, सर्पालय, सिद्धार्थ गार्डन इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या.भेटीदरम्यान ऐतिहासिक स्थळांची माहिती सहल प्रमुख प्रवीण रंगराव पाटील,रामदास हौसरे, हेमकांत पाटील यांनी सांगितली.सहलीच्या उत्तम नियोजनासाठी प्रतिभा कापडणे,यशराज निकम,सुरेश बोरसे,संध्या महाले यांचे सहकार्य लाभले.वेरूळ लेणी व बीबी का मकबरा येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी विदेशी पर्यटकांशी संवाद साधला व त्यांच्यासोबत फोटोही काढला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहली द्वारे ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्यामुळे गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील,केंद्रप्रमुख अशोक खेडकर,पालक व नागरिक यांनी कौतुक केले.



