लोहारा येथे माणुसकी समूहातर्फे वृक्षारोपण संपन्न. प्रत्येक सदस्याने झाड घेतले दत्तक.

लोहारा येथे माणुसकी समूहातर्फे वृक्षारोपण संपन्न. प्रत्येक सदस्याने झाड घेतले दत्तक.
जळगाव (प्रतिनिधी.)- जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व आँक्सिजन च्या तुटवड्यामुळे उष्माघाताने अनेक जणांना आपला जिव गमवावा लागला आहे.झाडांची होणारी कत्तल याचे हे दुष्परिणाम आहे.झाडे हे आँक्सिजन देण्याचे कार्य करतात व वृक्ष लागवड ही काळाची गरज हा विषय मनी धरुन आषाढी एकादशी व माणुसकी समूहाचे मार्गदर्शक एबीपी माझा न्युज चे रिपोर्टर चंद्रशेखर नेवे साहेब, व माणुसकी समूहाचे सदस्य उज्वल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीराम कृष्ण हरी मंदिर लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक पर्यावरन प्रेमी माजी मुख्याध्यापक डब्ल्यू एस पाटील,विकासाचे चेअरमन प्रभाकर चौधरी, ज्येष्ठ नागरिक बाबूलाल बोरसे, कडुबा चौधरी, बाबूलाल सुतार,अंबादास चौधरी, सुट्टीवर आलेले जवान नितीन क्षीरसागर (CRPF )यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी यावर्षी वृक्षारोपणासाठी पर्यावरण प्रेमी डब्ल्यू एस पाटील सर यांनी 20 वृक्ष माणुसकी समूहाला भेट दिली. या अगोदर देखील श्रीराम मंदिर परिसरामध्ये लावलेले अशोक वृक्ष आज डोलाने उभी आहेत त्यामुळे मंदिराचा परिसर हिरवागार झाला आहे,माणुसकी समूहाने ही झाडे लाऊन त्यांना पाणी घालुन ते जगवण्याचा निर्धार करून प्रत्येक झाड सदस्याने दत्तक घेतले आहे व पुढच्या वर्षी या वृक्षांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले त्यामुळे हा समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये माणुसकी समूह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था वेळोवळी समाज उपयोगी उपक्रम राबवीत असतात जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला जातो.यावेळी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, श्रीराम कृष्ण हरी मंदिराचे पुजारी ह.भ.प रवींद्र महाराज कलाल,गोकुळ माळी,नरेंद्र पाटील, भिका माळी,गुणवंत सरोदे,शेनफडू कोळी,अनिल तडवी,स्वरा क्षीरसागर,व लोहारा येथील माणुसकी ग्रुप सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली.
———————————–
वृक्षारोपण काळाची गरज माणुसकी समुहाचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी
लोहारा गावातील माणुसकी ग्रुप सदस्य यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, त्यांचा उत्साह जबरदस्त होता. माणुसकी समूहाची टीम खरंच उत्साहाने समाज कार्य करत असतात वृक्षारोपण काळाची गरज असून त्याची भरपूर फायदे आहेत. भावी पिढीसाठी ही एक शिदोरी आहे ती आपण जपली पाहिजे व एक तरी वृक्ष लावून आपण ते जगवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.



