आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाच, पाच लाखाचे व्यायाम शाळा साहित्य वाटप

आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाच, पाच लाखाचे व्यायाम शाळा साहित्य वाटप*
भडगाव(प्रतिनिधी ) – आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाच, पाच लाखाचे व्यायाम शाळा साहित्य माऊली स्पोर्ट पाचोरा यांच्या माध्यमातून शहरातीलपेठ व यशवत नगरीतील भोई वाडा येथे नगरसेवक जगन भोई, नगरसेवक संतोष महाजन शिवसेना शहर प्रमुख अजय (आबा) चौधरी, युवा सेना शहर प्रमुख दुर्गेश वाघ, उपशहरप्रमुख विनोद भोई, दक्षता समिती सदस्य जितेंद्र आचारी, आबा महाजन, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य नितीन महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नागरिकांचे व युवंकाचे आरोग्य उत्तम राहावे, दररोज व्यायामाची सवय व्हावी, यासाठी परिसरातील युवकांसाठी व नागरिकांसाठी असलेल्या या व्यायाम शाळेत आमदार किशोर पाटील यांनी आपल्या निधीतून ही साहित्य उपलब्ध करून दिली आली आहेत. या व्यायामशाळा साहित्या मध्ये मल्टी जिम चार स्टेशन, ऑलिम्पिक बेंच डंबल, सुपर बेंच एक्स्ट / कर्ल कॉम्बो ट्रेडमिल स्पिन सायकल, मिरर एसटीडी आकार, रबर मॅट चार आदी सह मशनिरी आहेत.




