खान्देश

सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर”  पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात !

सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर”  पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

पाचोरा -(प्रतिनिधी ) येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.सौ. सा.प. शिंदे प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर” या पुस्तकाचे प्रकाशन आज दिनांक 28 रोजी प्राचार्य बी. एन. बापू पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला सहकार नेते सतीश बापू शिंदे, पी.टी.सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, पिटीसी चे संचालक डॉ.जयवंतराव पाटील गिरणाई संस्थेचे सचिव अड. जे. डी. काटकर, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष नीरज मनोज, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, जितेंद्र पाटील सर उपस्थित होते.

सौ सा. प. शिंदे प्राथमिक विद्यालय पाचोरा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राचार्य बी.एन.बापू पाटील व मान्यवरांच्या हस्ते “सुंदर हस्ताक्षर” या कृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बी. एन.पाटील यांनी पुस्तकाचे मुक्तकंठाने कौतुक करत लेखिका सुवर्णा पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुंदर हस्ताक्षर पुस्तकाच्या लेखिका श्रीमती सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी पुस्तक परिचय करून दिला. सुवर्णा पाटील ह्या शिक्षकी व्यवसाय सोबतच एक उत्कृष्ट रांगोळीकार व हस्ताक्षर तज्ञ म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कलाविष्कार व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरावर विविध मानपत्र व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रा. शिवाजी शिंदे , डॉक्टर जयवंतराव पाटील, ॲड. जे.डी. काटकर यांनी आपापल्या मनोगतातून लेखिकेच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव शिंदे यांचे वतीने नीरज भाई मुणोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सौ. सा.प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक सुनील नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर मुंबई येथील श्रीमती डॉ..प्रतीक्षा प्रसाद बोर्डे.(शिक्षिका) यांनी सूत्रसंचालन केले.तसेच डॉ. अर्चना रमेश विसावे (शिक्षिका) यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला पाचोरा शहर व तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. मित्रपरिवार ,एल जी ग्रुप,तसेच सा.प.शिंदे शाळेतील व कै. पी. के. शिंदे विद्यालयातील शिक्षक बंधू- भगिनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button