पाळधी येथे रस्ता सुरक्षा अभियान 2024 संदर्भाने दिनांक 15 1 2024 ते दिनांक 15 2 2019 पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान

पाळधी येथे रस्ता सुरक्षा अभियान 2024 संदर्भाने दिनांक 15 1 2024 ते दिनांक 15 2 2019 पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान !
पाळधी (प्रतिनिधी) – पोलीस मदत केंद्र पाळधी तर्फे माननीय अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य रवींद्र सिंगल , पोलीस अधीक्षक मोहन दहिकर , उपविभागीय पोलीस अधिकारी , प्रदीप मैराळे उपविभाग नाशिक तसेच धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक, हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियान 2024 संदर्भाने दिनांक 15 1 2024 ते दिनांक 15 2 2019 पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान साजरा करणार येत आहे सदर. सदर अभियान ची अंमलबजावणी ही पाळधी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी श्री सपोनी शेजवळ सपोनी भागवत पाटील व पीएसआय राजेंद्र सोनवणे व कर्मचारी हे करत असून कार्यक्रमांतर्गत शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय खासगी कार्यालय येथे वाहतूक नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम रस्त्यावरील ट्रॅक्टर डंपर बैलगाडी यांना रिफ्लेक्टर लावणे. त्याचप्रमाणे रिक्षा चालक ट्रक चालक यांच्या डोळ्यांची वैद्यकीय तपासणी व संपूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी व रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे भितीपत्रके व कॉम्प्लेक्स वाटून जनजागृती करण्यात येत आहे



