खान्देश

पाचोरा येथील सुषमा पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

पाचोरा येथील सुषमा पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

पाचोरा – येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका सुषमा पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय नागरीरत्न विभागातील शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  व्यंकटराव जाधव यांनी ह्या पुरस्काराची घोषणा केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी, राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमती सुषमा पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती म. ज्यो.फुले शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  पंडितराव शिंदे, सचिव , जे. डी. काटकर यांनी सुषमा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button