प्रा. राजेंद्र साहेबराव पाटील कलाशिक्षक यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !

प्रा. राजेंद्र साहेबराव पाटील कलाशिक्षक यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान, “
जळगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सर्वांगीण विकासासाठी कलेचे महत्त्व, जाणणारी व जोपासणारी तसेच कलाशिक्षकांचे महत्त्व जाणणारी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ ही राज्यातील एकमेव राज्य संघटना असून ही संघटना विद्यार्थी , कला विषय व कलाशिक्षकांसाठी अनेक उपक्रम सदर संघटना राबवित असतात.
कला विषयातील समस्या, कला शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी जागृत व त्यांना न्याय देणारी एकमेव कलाशिक्षक संघटना असून आज पर्यंत कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना न्याय देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व कला शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ हे राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन उपक्रमशील कला शिक्षकांना सन्मानित करीत असते.
संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद अधिवेशन हे दरवर्षाप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होत असते ते यावेळी पालघर जिल्ह्याला मान मिळाला. अतिशय सुंदर असे आयोजन व नियोजन तसेच विविध कलांचे प्रदर्शन यावेळी विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आल्या अनेक कला शिक्षकांचे प्रात्यक्षिके झाली. यावेळी उद्घाटक मा. राज्याचे शिक्षण मंत्री मा दिपकजी श्री केसरकर साहेब यांनी कलाशिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला यावेळी व कलाशिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी महामंडळ पदाधिकारी यांना वेळ देवून प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्यातील सर्व कलाशिक्षकांना व मंचावरील उपस्थित महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिली व कलाध्यापक संघ महामंडळ करत असलेल्या कामांचे कौतुक करून नोंद घेत सर्व कला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
परिषदेचे स्वागताध्यक्ष कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर जी म्हात्रे यांनी कलाशिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न समजून तो सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनावरील साकार होत असलेल्या मोठ्या उपक्रमाचे कार्य करत असलेल्या जगविख्यात मूर्तिकार मा.भगवान जी रामपुरे यांनीही कलाशिक्षण परिषद घेऊन मूर्ती कामाविषयी तसेच अक्कलकोट येथे सुरू असलेल्या स्वामी समर्थ महाराजांवरील कार्याचे माहिती देऊन सर्व कला शिक्षकांशी चर्चासत्रद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले. डहाणु, ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली वारली चित्रकला शैलीचे प्रात्यक्षिक श्री संजय प-हाड सरांनी करून तसेच सौ.योगिनी म्हात्रे मॅडम यांचे कथक नृत्यावर मार्गदर्शन झाले, विद्यार्थ्यांनी विविध लोककलेची नृत्य सादर करून कला शिक्षकांची मने जिंकली , तसेच राज्यातील विविध कला शिक्षकांनी आपले कला गुण सादर करत शिक्षकांना प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे कला शिक्षणाविषयी मार्गदर्शन केलेयावेळी राज्यातील उपक्रमशील कला शिक्षक बांधवांना डोम्स् कंपनीव्दारे जिल्हास्तरीय तसेच जळगांव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज जळगांव संचलीत, शिक्षणशास्त्र विदयालय (पुरुषांचे ) जळगाव, येथील कलाध्यापक प्रा. राजेंद्र साहेबराव पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेतील सर्व पदाधिकारी . चेअरम, व्हा.चेअरमन, मानद सचिव,तसेच शिक्षण शास्त्र विद्यालय जळगाव येथे प्राचार्य श्रीमती एस डी सोनवणे, सर्व अध्यापकाचार्य, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंद केले. यावेळी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून ८३६ कला शिक्षकांनी कलाशिक्षण परिषदेत हजेरी लावली.
पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष मा.श्री रुपेश वझे सर तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व कला शिक्षकांनी परिषदेचे अतिशय सुंदर असे नियोजन केले… कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्याध्यक्ष मा.श्री नरेंद्र बारई सर यांनी भूषविले तर मंचावर राज्यसरचिटणिस श्री. दिगंबर बेंडाळे, राज्य उपाध्यक्ष बलाराम सामंत, राज्य कोषाध्यक्ष श्री. विजयसिंह ठाकूर, राज्य सह सरचिटणीस श्री प्रकाश पाटील, राज्य सल्लागार श्री. पी.आर. पाटील, श्री.एम. ए. कादरी,श्री.हिरामण पाटील, महिला आघाडी अध्यक्ष, श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, सचिव जोत्स्ना पाटिल, पूणे जिल्हा अध्यक्षा सौ.अश्विनी कदम, जि.प.पालघर अध्यक्ष मा.श्री. निकम, बोर्डी चे सरपंच श्याम दुबला, महामंडळाचे राज्यातील सर्व विभागीय उपाध्यक्ष, सहकार्यवाह, सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव, सर्व प्रसिद्धी प्रमुख, सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा क्षीरसागर यांनी केले.



