खान्देश

वीजबिलांविरोधात शिवसेनेचा इशारा; स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

वीजबिलांविरोधात शिवसेनेचा इशारा; स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा-भडगाव शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. वाढीव वीजबिलांच्या तक्रारी तातडीने थांबवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर गुणवंतराव बारवकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता, पाचोरा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा व भडगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या कायम असून, अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे ग्राहकांच्या हिताचे नाही.

नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

नवीन स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत तसेच वाढीव वीजबिलांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पाचोरा शहरातील ग्राहकांना अवाजवी वीजबिले देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने त्याची तातडीने दखल घेण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घेऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना व युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाचा इशारा

नागरिकांना कोणत्याही प्रकारचे वीजबिल भरण्यास प्रवृत्त केले जाणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. भविष्यात या आंदोलनातून कोणताही कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रसंगी गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेवक सतीश चेडे, प्रदीप वाघ, अशोक पाटील, प्रवीण ब्राम्हणे, संजय चौधरी, शाहीद शेख, संजय गोहील, किशोर पाटील, विकी बाविस्कर, भोला पाटील, नितीन चौधरी, पिंटू शिंदे, बंडू सोनार, अनिल पाटील, सुनील गौड, भूषण अहिरे, आकाश पाटील, भुत्ता चौधरी, भैय्या चौधरी, अतुल महाजन, आबा पाटील, सौरभ चेडे, तुषार पाटील, जय बारवकर, नयन तांदळे, साई सिसोदिया, श्याम पाटील, किरण परदेशी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button