newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 18 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

- Advertisement -

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 18 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

- Advertisement -

जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) :- सुझुकी मोटर, गुजरात या कंपनीतर्फे आयटीआय उत्तीर्ण व दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जे उमेदवार दहावी उत्तीर्ण व कमीत कमी 55 टक्के गुण तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. हा मेळावा 18 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे होईल. पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यात Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & Die Maker, Plastic Processing Operator, Coe (Automobile), Tractor Mechanic, Painter General उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. पात्रता :- वय 18 ते 22 वर्षे, आयटीआय पास (SCVT & NCVT), वेतन : 19400/- असे आहे, असे सहा. प्रशि. सल्लागार (तां.), मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisement -