समुद्राच्या लाटांशी झुंजत पाचोरा चिंचखेडा येथील पोलिस जवानाने मुंबईच्या समुद्रातून वाचविले महिलेचे प्राण

समुद्राच्या लाटांशी झुंजत पाचोरा चिंचखेडा येथील पोलिस जवानाने मुंबईच्या समुद्रातून वाचविले महिलेचे प्राण
पाचोरा (न्यूज झेप इंडिया वृत्त सेवा)समुद्राच्या लाटांशी झुंजत पाचोरा चिंचखेडा येथील पोलिस जवानाने मुंबईच्या समुद्रातून वाचविले महिलेचे प्राण पोलिसाला नेहमुच कोणत्या न कोणत्या कारणाने टार्गेट केले जाते . परतू पाचोरा चिंचखेडा येथील मिल्ट्री रिटायर्ड व सध्या पोलिसात नोकरीस असलेले किरण ठाकरेंचे धाडसाचे समाज माध्यमातूनच नव्हे तर पोलीस अधिकारी व मुंबईकर यांचें कडून हि त्यांचे कौतुक होत आहे.
त्यासाठीचे कारणही तितकेच महत्वाचे चला पाहू या सविस्तर वृत्त :- चिंचखेडा खुर्द येथील किरण अशोक ठाकरे हे सध्या मुंबई येथील मरीन लाईव्ह पोलीस स्टेशनला नियुक्तीस आहेत. 18 वर्ष भारतीय सैन्य दलात देश सेवा बजावून ते सध्या पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी मरीन लाईनवर ते सुरक्षे कामी कर्तव्यावर तैनात होते. दमदार पाऊस व खवळलेल्या समुद्राचा रुद्रावतार पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे येथे मुंबईकरांची गर्दी झाली होती. माटुंगा येथील स्वाती कांतीलाल कनानी या देखील मरीन ड्राईव्ह वरील समुद्रकिनाऱ्या लगतच्या भिंतीवरून (फूटपाथ) फिरत असताना पाय घसरून तोल जाऊन त्या 20 फुट खोल समुद्रात पडल्या. हा प्रकार तेथे कर्तव्य बजावत असलेल्या किरण ठाकरे यांनी पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता व जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेतली. त्यांचे पाठोपाठ सोबत असलेला त्यांचा सहकारी अमोल दहिफळे यांनीही समुद्रात उडी घेतली. दोघे पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी समुद्राच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व लाटेत अडकलेल्या स्वाती कनानी यांना ओढत काठावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने सुमारे पंधरा मिनिटे समुद्राच्या लाटांशी अक्षरशः झुंज देत त्यांना समुद्राकाठी आणण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी प्लॅस्टिक रिंग, टायर व दोरखंड त्यांच्या दिशेने फेकल्या नंतर त्याच्या सहाय्याने किरण ठाकरे व अमूल दहिफळे यांनी स्वाती कनानी यांना काठावर आणले. स्वाती कनानी ह्या प्रचंड घाबरलेल्या असल्याने त्यांना धीर व दिलासा देत पोलीस वाहनातून जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत असून किरण ठाकरे व अमोल दहिफळे या दोघांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबईकरां कडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. ते पाचोरा येथील सह्याद्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे पोलिस भरतीचे माजी विद्यार्थी देखिल आहेत म्हणुन मार्गदर्शन केंद्र. व अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान तर्फे लवकरच त्यांचा सत्कार व सन्मान केला जाणार आहे तर जळगाव जिल्ह्यात राज्य सरकार मध्ये तीन मंत्री आहेत तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे अति जवळचे आमदार व पदाधिकारी आहेत किमान त्यांनी आपला भूमिपुत्र म्हणून त्याचे नाव राज्य सरकारकडे सन्मानाकरिता पाठवावे नव्हे तर आग्रह करावा अशी अपेक्षा सह्याद्री भूषण व
न्यूज झेप इंडिया कडून केली जात आहे तसेच ज्या विविध राजकीय सामाजिक संघटना आहेत त्यांनी देखील किमान या शौर्यवान पोलिसाच्या चिंचखेडा या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला तर ही बाब निश्चितच प्रेरणादायी असेल चिंचखेडा येथील प्रशांत ठाकरे पाटीले Mo.9850504645 यांचे ते भाऊ आहेत



