डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार !

डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार.
पाचोरा – भारत पाटील (म्हसास प्रतिनिधी) दिनांक 06/01/2024 रोजी पत्रकार दिनानिमित्त लोहारा ता.पाचोरा येथील डॉ जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयात परिसरातील सर्व पत्रकारांना आमंत्रित करून दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यऻपण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके होते, तसेच कार्यक्रमास हजर पत्रकार ,वेब मिडियाचे संपादक, प्रतिनिधी हजर होते , माध्यमिक विद्यालयातफे॑ सर्व पत्रकारांना रूमाल व गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस.टी.चिचोले ह्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्या जीवनकार्यवर विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच लोहारा पत्रकार मंचचे अध्यक्ष दिपक पवार यांनी देखील पत्रकारांविषयी मार्गदर्शन केले,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके ह्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी कार्यक्रमास पत्रकार महेंद्र शेळके, दिनेश चौधरी, रमेश शेळके, ज्ञानेश्वर राजपूत, चंद्रकांत पाटील, दिपक पवार, दिलीप चौधरी, गजानन क्षिरसागर, दिलीप परदेशी, भारत पाटील विद्यालयचे मुख्याध्यापक एस.टी.चिचोले, उपमुख्याध्यापिका सौ.यु,डि.शेळके मॅडम, पर्यवेक्षक शिरापुरे सर, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बाजीराव पाटील तर आभार आर.सी.जाधव ह्यांनी मानले



