राजकीय

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

पाचोरा(वार्ताहर) दि,७आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सरसावला असून संघटना बांधणीच्या अनुशंगाने शिवसेनेतील युवकांचे भक्कम संघटन असलेल्या युवासेनेच्या बळकटी साठी पाचोरा येथील जितेंद्र जैन यांची जळगाव जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव येथील अजिंठा विश्राम गृह येथे लोकसभा संपर्क प्रमुख संजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जळगाव लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी बोलतांना संपर्क प्रमुख चौधरी यांनी जैन यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी त्यांचा यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,महानगर प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  निवडणुकांच्या काळात अधिकाधिक युवकांना पक्षासोबत जोडून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा मानस यावेळी जितेंद्र जैन यांनी व्यक्त केला असून आपल्याला दिलेल्या महत्वपूर्ण जबाबदारी बद्दल त्यांनी पक्षाच्या वरीष्टांसह आमदार किशोर पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button