आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाला शिरधाणे, उडाणे येथे किर्तन,कानबाई गितांचा कार्यक्रम.

आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाला शिरधाणे, उडाणे येथे किर्तन,कानबाई गितांचा कार्यक्रम.
उद्या स.१० वाजता अभिष्टचिंतन सोहळा
प्रतिनिधी: सतिष पवार
धुळे- धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने बुधवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. देवपूर धुळे येथील आमदार कार्यालयातील सुंदरसावित्री सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिरधाणे प्र.नेर,उडाणे येथे किर्तन तसेच कानबाई, सप्तशृंगी मातेच्या महिमेवर आधारीत गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच एसएसव्हीपीएस महाविद्यालय, देवपूर धुळे येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
बुधवार दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शिरधाणे प्र.नेर ता.धुळे येथे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवने,परतुरकर यांचे रात्री ठिक ८:३० वा. जाहिर किर्तन होणार आहे. सेवादलाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भदाणे, सेवा सोसयटीचे व्हा.चेअरमन रावसाहेब सोनवणे यांनी किर्तनाचे आयोजन केले आहे. तर उडाणे ता.धुळे येथे महंत १०८ सोमेश्वरी नंदगिरी महाराज यांचे प्रवचन सायंकाळी ७ वा. तर आबा चौधरी,धिरज चौधरी, खान्देश किंग गृप यांच्या कानबाई-सप्तशृंगी मातेच्या महिमेवर आधारीत गितांचा कार्यक्रम रात्री ९ वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री धर्मराज बागुल आणि उडाणे ग्रामस्थांनी केले आहे. आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालयात दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब हिरे मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल यांच्या रक्तपेढीचे वैद्यकीय पथक रक्त संकलनाचे काम करणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मनोहर पाटील हे राहणार आहेत. दरम्यान आ.कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे येथील कार्यालयासमोरील सुंदर सावित्री सभागृहातही भव्य रक्तदान शिबीर होणार आहे. रक्तदान शिबीराला सकाळी ९ वा. प्रारंभ होणार आहे.
अभिष्टचिंतन सोहळा- महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने बुधवार दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा.अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. देवपूर धुळे येथील आमदार कार्यालयातील सुंदरसावित्री सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने हा कार्यक्रम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.



