खान्देशजळगांव जिल्हा

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट
जळगाव खान्देश मराठा वधू वर ग्रुप तर्फे वडनगरी फाटा येथील श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास 60 लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व आर ओ मशीन नुकतेच सप्रेम भेट देण्यात आले.यावेळी जळगाव खान्देश मराठा वधू वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा गौरी उद्योग समूह वावडदा चे चेअरमन बापूसाहेब सुमीत पाटील,उपाध्यक्ष नानासाहेब किशोर पाटील,सदस्य भैय्यासाहेब निलेश पाटील,संदिप पाटील सर,साई सुमित पाटील व ग्रुप चे इतर सदस्य तसेच मंदिर समितीचे जगदीश चौधरी व इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.वडनगरी फाटा येथील श्री बडे जटाधारी महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी, सेवेसाठी रोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्या सर्व भविकांना पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळावे व त्या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा व्हावी यासाठी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून वॉटर कुलर व आर ओ मशीन आपण द्यावे असा मानस ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केला यास ग्रुप चे उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी तात्काळ होकार दर्शवत 60 लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व आर ओ मशीन मंदिर स्थळी भेट देत मंदिर समितीचे जगदीश चौधरी यांच्या उपस्थितीत मंदिरास सुपूर्त केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना जळगाव खान्देश मराठा वधुवर परिचय ग्रुप चे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांनी या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा करण्याचे भाग्य लाभले असल्याबाबत आनंद व्यक्त केला.या सर्व सेवेसाठी जळगाव खान्देश मराठा वधु वर परिचय ग्रुपचे सर्व ग्रुप ऍडमीन,सदस्य,मान्यवर यांचे सहकार्य लाभले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button