खान्देश

चितोड येथील विसर्जन दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न-आ.कुणाल पाटील

चितोड येथील विसर्जन दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना
आर्थिक मदतीसाठी प्रयत्न-आ.कुणाल पाटील
आमदारांचे रुग्णालयातच ४ तास ठाण मांडून !
प्रतिनिधी: सतिष पवार (९५२७७९९३०४)
(दि १९/०९/२०२४)
धुळे- धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील चितोड येथे गणेश विसर्जनासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून झालेल्या अपघातात चार एका महिलेसह तिघा बालकांना दुर्दैवीपणे प्राण गमवावा लागला.घटनेची माहिती समजताच आ.कुणाल पाटील यांनी जिल्हा रुग्णालय गाठले आणि रुग्णांची जखमी रुग्णांची विचारपूस केली व मृतांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. दरम्यान मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.
धुळे शहरानजिक असलेल्या चितोड गावात अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपती विसर्जनसाठी जात असलेल्या टॅ्रक्टर विसर्जन मिरवणूकीत घुसल्याने एका महिलेसह तीन बालकांना प्राण गमावावे लागले. तर काही जण जखमी झाले. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच आ.कुणाल पाटील यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी जखमी रुग्ण व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला प्रत्येक जखमी रुग्णांची तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून विचारपूस करुन त्यांना आधार दिला. तसेच जखमी रुग्णांवर तत्काळ अतिदक्षता विभागात उपचार करण्याच्याही सूचना दिल्या. तसेच शवागारमध्ये जाउन येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांशी चर्चा करुन नातेवाईकांच्या संमतीनुसार शवविच्छेदनाची तत्काळ प्रक्रीया करावी. घटना दुर्देवी असून संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमी रुग्ण व मृतांच्या नातेवाईकांना ताटकळत ठेवू नये अशा सूचना केल्या.
तब्बल ४ तास रुग्णालयातच ठाण-घटनेचे वृत्त समजताच आ.कुणाल पाटील यांनी थेट नाशिकहून धुळ्यातील जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात जाऊन मृत व जखमींच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार होत असल्याची आ.पाटील यांनी खात्री केली. त्यांनी प्रत्येक जखमी रुग्णाजवळ उभे राहून डॉक्टरांकडून उपचार करुन घेतले. रुग्णांवर परीपूर्ण उपचार होईपर्यंत आ.कुणाल पाटील हे तब्बल चार तास रुग्णालयातच ठाण मांडून बसले होते. त्यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी डॉ.अजित पाठक, डॉ.प्रकाश सुकडे, डॉ.प्रिया यांचे वैद्यकीय पथकाने उपचार केले.
आर्थिक मदतीसाठी प्रयत्न-चितोड गावात झालेली घटना ही दुर्दैवी असून मृतांच्या कुटूंबियासह संपूर्ण गावावर दु:ख कोसळले आहे. या घटनेतील बाधित कुटूंबियांना सावरता यावे व त्यांना आधार मिळावा म्हणून मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button