खान्देश

कष्टाचे खातो म्हणणाऱ्या भुजबळांनी घर हडपले — अंजली दमानिया यांचा पत्रकार परिषदेत आरोप !

मूंबई – (वृत्तसेवा) – सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून फर्नांडिस कुटुंब त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतंय परंतु भुजबळांकडून कुठलीही दाद मिळत नाही.कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ४८ तासांत कुटुंबाला पैसे न मिळाल्यास भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली का तर ,  गेल्या दीड वर्षापासून आम्ही फर्नांडिस कुटुंबासाठी लढतोय, आम्ही एफआयआर केली. छगन भुजबळांचे मी प्रक्षोभक भाषण ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली. तुमचं खातो का, मी माझ्या कष्टाचे खातो असं विधान त्यांनी केले. काल जे भुजबळ बघितले त्यांच्यात इतका जोर कुठून आला? नेमकं कुठल्या कष्टाचे खातायेत ते दाखवण्यासाठी आज मी भुजबळांचे घर मीडियाला दाखवणार होते. जे त्यांचे घर नसून हे फर्नांडिस कुटुंबाचे लुटलेले घर आहे. १९९४ मध्ये फर्नांडिस कुटुंब त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला असं त्यांनी सांगितले. या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. तो जो बंगल्याचा प्लॉट होता तो समीर भुजबळांच्या परवेज कन्ट्रक्शनला परस्पर विकला गेला. ज्यादिवशी बंगला बुलडोझरनं पाडला त्यानंतर कुटुंब समीर भुजबळांना एकदा नव्हे हजारवेळा भेटले. तरीही आजतागायत या कुटुंबाला १ रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही. सांताक्रुझ पश्चिमेला ती जी टोलेजंग इमारत आहे. जे ते कष्टाचे असल्याचे बोलतात, हा लुटलेला होता. फर्नांडिस कुटुंबाचा बंगला पाडून मोठी इमारत बांधलीय. त्या ९ व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलंय. जिथे भुजबळ कुटुंब पोहते. हे या कुटुंबाचे पैसे आहेत. आजतागायत कुटुंबाला पैसे मिळाले नाहीत असा आरोप त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दमानिया यांनी केला.

त्याचसोबत ज्यांच्याकडून मला अपेक्षाही नव्हती मी त्या सुप्रिया सुळेंना हे सर्व पाठवले, ३० सेकंदात त्यांचा फोन आला. माणूस पाठवून या कुटुंबाची पडताळणी केली. अक्षरश: या कुटुंबाची दयनीय परिस्थिती आहे. ७८ वर्षाची बाई ३ दिव्यांग मुलांना एकटं सांभाळते. ती उद्या गेली तर उद्या या मुलांना कुठे ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. दीड वर्ष झाले तरी समीर भुजबळ टोलवाटोलवी करत होते. जानेवारी महिन्यात साडे ८ कोटी देतो म्हणून सांगितले परंतु त्यानंतर भाजपात जाणार असल्याचे कळाल्यानंतर हे पैसे थांबवले. तुमच्याकडे इतका पैसा आहे पण या कुटुंबाला न्याय हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. 
साभार लोकमत फेसबुक लाइव्ह

छगन भुजबळांनी फेटाळले आरोप !
अंजली दमानिया यांच्या आरोपावर छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कुणाचेही घर लाटले नाही. याबाबत कोर्टात केस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. परंतु हे नाटक त्यांना आजच का करायचे सुचले. जेव्हा ओबीसींची मोठी लढाई सुरू झाली तेव्हा हे पुढे आले. ही सगळी नाटके मला माहिती आहे. त्यांना त्यांचे नाटक लखलाभ होवो अंजली दमानिया ताई आहेत, मी अधिक बोलणार नाही. हे सुपारी घेऊन बोलणारे यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही असं म्हणत भुजबळांनी आरोप फेटाळले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button