खान्देशजळगांव जिल्हा

पाचोरा येथे विपश्यना साधना शिबिर उत्साहात !

पाचोरा येथे विपश्यना साधना शिबिर उत्साहात !

पाचोरा- येथील श्री सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी विपश्यना साधनेचे प्रथम चरण आनापान सती या अनमोल विद्येचे शिबीर उत्साहात संपन्न झाले.

येथील उपशिक्षिका सारिका पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी खास बालकांसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात पुज्य विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजी यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ द्वारे या अनमोल विद्येची शिकवण बालकांना दिली जाते. शिबिराचे संचालन बाल आनापान शिबीर शिक्षक करतात. यात प्रामुख्याने मुलांना मनावर नियंत्रण, ताबा ठेवण्यासाठी शिकविले जाणारे शिक्षण/तंत्र असते.

शिबारार्थी मुलांनी नियमित सराव केल्यानंतर अनेक फायदे यातून जाणवतात. शिबीराला विपश्यना शिबीर केलेले साधक सेवा देतात. हे शिबीर निशुल्क असते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button