खान्देशजळगांव जिल्हा

खेळाच्या मैदानासाठीची जागा हस्तांतरीत करा ! माजी नगरसेवक एडव्होकेट. अमोल पाटील यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे)-खेळाच्या मैदानासाठीची जागा हस्तांतरीत करा ! माजी नगरसेवक ॲड. अमोल पाटील यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भडगाव नगरपरिषद हद्दीतील सुक्या नदीपात्रातील नदीजवळील शासकीय मालकिच्या जागेत शहर विकास आराखड्यातील आरक्षण क्र.७४ आणि ७५ यावर खेळाचे मैदानाचे आरक्षण आहे.तरी सदर जागेवर मैदान विकसित होणेसाठी संबंधित जागा शासनाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरीत होणे आवश्यक आहे. तरी सदर जागेत क्रिडा संकुल/क्रिडांगण/ खेळाचे मैदान विकसित करणेसाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरीत होण्यासाठी आवश्यक त्या पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव मा.जिल्हाधिकारीसोा,जळगाव यांचेकडे सादर करण्याची विनंती भडगाव येथील भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा माजी नगरसेवक ॲड.अमोल नाना पाटील यांनी निवेदनाद्वारे भडगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल पाटील,श्री.शरद हिरे,श्री.मिलिंद बोरसे हे उपस्थित होते.

सुक्या नदीपात्रातील संबंधित गट नं. हे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहेत. तरीही मागील ४० वर्षापेक्षाही जास्त वर्षापासून सदर जागेचा वापर हा क्रिडांगण म्हणून भडगाव शहरातील हजारो विद्यार्थी, खेळाडू, नागरिक वापर करीत आहेत. याच मैदानावर वर्षानुवर्षे सराव करून शेकडो खेळाडूंनी आपापल्या खेळात प्राविण्य मिळविले आहे. अनेक खेळाडूंनी तालुका,जिल्हा, विभाग, राज्य तसेच विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून पदक प्राप्त करून भडगावचा नावलौकिक वाढविला आहे.याच मैदानावर सराव करणाऱ्या भडगाव शहर व पंचक्रोशीतील ३ हजार पेक्षाही जास्त खेळाडूंनी,तरुणांनी विविध शासकीय विभागात नोकरी प्राप्त केली आहे.

सदर खुल्या मैदानावर आजपर्यंत क्रिकेट,कबड्डी,खो-खो,धावणे,ॲथलेटिक्स इ. विविध प्रकारच्या अनेक क्रिडा स्पर्धा वर्षानुवर्षे पार पडल्या आहेत व पार पडत आहेत. सदरच्या मैदानावरील नियमीत सरावामुळे भडगावकरांना निरोगी राहण्यास मदत होते.सदरचे मैदान हे भडगावकर नागरिकांसाठी आत्मियता,आस्थेचा विषय आहे. मैदान विकसित व्हावे हि अनेक वर्षापासून भडगावकरांची इच्छा आहे. या इच्छेला मूर्त रूप देण्यासाठी मैदान विकसित करणेकामी येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकिय बाबींची पूर्तता व पाठपुरावा होणे आवश्यक आहे. तरी अर्जात नमूद जागा शासनाकडून नगरपरिषदकडे हस्तांतरीत करणेकामी त्वरित सर्व पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मा.जिल्हाधिकारीसोा,जळगाव यांचेकडे पाठविण्यात येऊन जागा हस्तांतरण करुन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी शुभम पाटील,रितेश पवार, सागर परदेशी, सुशांत पाटील,अभिजित पाटील,तुषार पाटील,निखिल पाटील यांचीही उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button