पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध !

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ज्ञानगंगा म्हणून नावारूपाला आलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत अध्यक्ष, मानद सचिव, संचालक मंडळ, पेट्रन आणि डोनर अशा एकूण ३४ जागांसाठी ३३ जागांसाठी निवडणूक झाली. डोनरच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त राहिली.
निवडणुकीसाठी २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्यात आले. अध्यक्ष आणि मानद सचिव पदासाठी प्रत्येकी एक उमेदवार अर्ज दाखल केला. मॅनेजिंग कमेटी सिंपथायझरच्या २५ जागांसाठी २९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अंतिम मुदतीत चार उमेदवारांनी माघार घेतली. पेट्रनच्या सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एक उमेदवाराने माघार घेतली. सिंपथायझर जागेसाठी चार आणि पेट्रनच्या एक अशा पाच उमेदवारांनी माघार घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी ॲ.एस.बी. माहेश्वरी यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, चेअरमनपदी संजय नाना वाघ, मानद सचिवपदी अॅड महेश देशमुख आणि व्हि.टी. नाना जोशी यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांनी आनंद व्यक्त केला. ते संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
बिनविरोध नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालक
- अध्यक्ष – दिलीप भाऊ वाघ
- चेअरमन – संजय नाना वाघ
- मानद सचिव – अॅड महेश देशमुख
- व्हि.टी. नाना जोशी
- प्रा. सुभाष तोतला
- शिवनारायण जाधव
- राकेश थेपडे
- जीवराज आणले
- वासुदेव महाजन
- जगदीश सोनार
- मधुकर पाटील
- ब्रिजलाल संघवी
- योगेश पाटील
- भागवत महालपूरे
- सुरेश देवरे
- खलील देशमुख
- भागचंद राका
- लताबाई पाटील
- संजय कुमावत
- डॉ. जयवंतराव पाटील
- नानासाहेब देशमुख
- विनय जकातदार
- सुनिल पाटील
- सतीष चौधरी
- दत्तात्रय पवार
- विजय देशपांडे
- मनिषा पाटील
- प्रकाश पाटील
- अर्जूनदास पंजाबी
- जिजाबाई पाटील
- दगाजी वाघ
- डॉ. पितांबर पाटील
- दुष्यंत रावल
यावेळी मोहन पाटील, मधुकर वाघ, भुषण वाघ, आकाश वाघ, सुरज वाघ, श्याम भोसले, प्रदीप वाघ, शशिकांत वाघ, शिवदास पाटील, हर्षल पाटील, राहुल पाटील, विश्वासराव साळूंखे, रणजित पाटील, शालिग्राम मालकर, डी.व्ही.पाटील आणि जी.एन.पाटील आदी उपस्थित होते.



