खान्देश

गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे..!

गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे..!

भडगांव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गिरड येथून तीन अल्पवयीन मुली दि. १९ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहेत. त्यांचे रहस्यमयरित्या अपहरण झाले आहे. त्यांचा अद्याप तपास लागला नाही. घटनेमुळे नागरिक व मुली तसेच महिला वर्गात अत्यंत भिती व चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. मुलींची आई ज्योती संजय कोळी यांचे फिर्यादीवरून जयश्री कोळी, जयलक्ष्मी कोळी व अश्विनी सोनवणे गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता आहेत. आपल्या स्तरावरून तात्काळ युद्धपातळीवर तपास व्हावा. आणि सदर मुलींना पालकांच्या स्वाधीन करा. तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा घटना वारंवार घडतात यास वेळीच पायबंद घातला जाईल असा पद्धतीची कडक कारवाई व्हावी. सदर बाबतीत नागरिकांनीही सतर्क राहत पोलिस विभागास माहिती मिळताच सहकार्य करा. असे आवाहन अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्टान संचलित दामिनी महिला संघ पदाधिकारी मा. नगरसेविका योजना पाटील, सरला पाटील, डॉ. सुनिता मांडोळे, रेखा पाटील आदींनी पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांना निवेदन प्रसंगी केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button