संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती रॅली !

संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती रॅली !
पाचोरा, दि. २६ नोव्हेंबर २०२३
पाचोरा शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज संविधान दिनानिमित्त शहरातील समविचारी सामाजिक संघटना पदाधिकारी व सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येत संविधान दिन साजरा केला.
सर्व मान्यवरांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हातात संविधान दिनाचे स्लोगन असलेले पोस्टर घेऊन रॅली मा. ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तदनंतर रॅली छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली. छ. शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर जनजागृती रॅली हुतात्मा स्मारक येथे आल्यावर रॅलीचे रूपांतर अभिवादन सभेत झाले.
यावेळी मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्व, संविधानातील तत्त्वे आणि वर्तमानात सुरू असलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला.
या संविधान जनजागृती रॅलीत सचिन सोमवंशी, धनराज पाटील, विकास पाटील, प्रविण पाटील, सुनील पाटील, खलिल देशमुख, दत्ताआबा बोरसे, फईम शेख, किशोर डोंगरे, अशोक मौरे, राजू अहिरे, दीपक तायडे, गजानन पाटील, नाना सोनवणे, आर.पी. बागुल, राजू खचाने, मिलिंद ब्राम्हणे, प्रदिप जाधव, जय वाघ, दादा आदिवाल, देविदास थोरात, भावराव पवार, ए.बी. अहारे, सिद्धार्थ खरे, कैलास सोनवणे, देविदास पाटील, आकाश खैरनार, विजय गायकवाड, आर.आर. सोनवणे, सुनील भिवसने, यशवंत देहडे, मेजर संतोष कदम, दीपक वाकडे, अरविंद जगताप, संदीप जगताप, विश्वनाथ भिवसने, भीमराव खैरे, विक्की सिरसाठ, अमोल म्हस्के, आकाश नन्नवरे, संगीता रत्नपारखे, लता सपकाळे, राकेश सपकाळे, सतिष सपकाळे, सचिदानंद मोरे, दिलीप बागुल, राजेंद्र ब्राम्हणे, सुमेध ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
बातमीची मुख्य मुद्दे
- शहरातील समविचारी सामाजिक संघटना पदाधिकारी व सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येत संविधान दिन साजरा केला.
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
- मा. ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
- छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
- हुतात्मा स्मारक येथे अभिवादन सभेत संविधान दिनाचे महत्व, संविधानातील तत्त्वे आणि वर्तमानात सुरू असलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला.
बातमीचे निष्कर्ष
- शहरातील समविचारी सामाजिक संघटना व सर्व पक्षांचे पदाधिकारी संविधान दिनाचे महत्व जाणून घेतले.
- संविधानातील तत्त्वांचे पालन करून सामाजिक न्यायाची स्थापना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
- वर्तमानात सुरू असलेल्या घडामोडींवर संविधानाच्या आधारे विचार करणे आवश्यक आहे.



