वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ५ जण गंभीर जखमी !

वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ५ जण गंभीर जखमी !
मुंबई- मुंबईतील वांद्रे परिसरात आज शनिवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीतील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, लागलेल्या आगीत ५ जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



