खान्देशजळगांव जिल्हामहाराष्ट्र

२३ रोजी होणार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निर्मल सीड्स चे संस्थापक स्व. माजी आमदार आर ओ पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण !

निर्मल सीड्स येथे होणार माजी आ. स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

: पाचोरा (प्रतिनिधी) –  पाचोरा येथील भडगाव रोडवरील अटल  मैदानावर होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव • बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु असून याबाबत शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी  याबाबत पत्रकारांना माहिती दिली.  महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षात व फोडाफाडीच्या राजकारणानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पाचोरा आणि भडगाव  विधानसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी  येत असून या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याठिकाणी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील माजी आमदार स्व. आर. ओ तात्या पाटील यांचे पुतणे असून वैशाली सूर्यवंशी ह्या त्यांच्या बहीण आहेत. ज्या प्रमाणे बीड जिल्ह्यातील मुडे कुटूंबातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे दोन्ही दिग्ज नेते दोन वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले आहेत त्याच प्रमाणे पाचोरा भडगाव मतदार संघात

देखील शिंदे गटात सध्याचे आमदार किशोर पाटील तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी (पाटील) असून या दोन्ही भाऊ बहिणीमध्ये आता यापुढील सत्ता संघर्ष सुरु होणार असल्याचे चित्र या सभेमुळे निर्माण झाले आहे ?

यासाभेकडे सर्वांचे लक्ष :- याप्रसंगी आमदार किशोर पाटील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आपली उपस्थिती देणार का कि काही कारणास्तव बाहेर गावी आपला दौरा काडणार व अनुपस्थितीत राहणार हे चित्र मात्र स्पष्ट झाले नाही. याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे . 

यामध्ये सकाळी जळगाव येथे आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे जळगाव येथील पत्रकार परिषद संपत्र झाल्यावर पाचोरा येथील निर्मल सीड्सला माजी आमदार स्व.तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्या हस्ते होणार असून त्याच बरोबर आशियातील सर्वात मोठ्या  निर्मल लॅबचे देखील उदघाटन याठिकाणी करण्यात येणार आहे. तदनंतर सायंकाळी ५ वाजता भडगाव रोडवरील अटल मैदानावर भव्यदिव्य जाहीर सभेला उद्धव ठाकरे संभोधित करणार असल्याची माहिती शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी दिली आहे. यावेळी रमेश बाफना, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, कैलास मिस्तरी, संदीप जैन आदी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button