खान्देश

वैद्यकीय मदतीसाठी तहसील कार्यालयाला दीपावलीच्या सुट्ट्या असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला

वैद्यकीय मदतीसाठी तहसील कार्यालयाला दीपावलीच्या सुट्ट्या असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला

चाळीसगाव प्रतिनिधी – अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ लागणारा उत्पन्नाचा दाखला चाळीसगाव तहसील कार्यालयच्या वतीने नायब तहसीलदार यांनी कार्यालयाला सुट्टी असताना देखील माणुसकीचे नाते जपत दाखला दिल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांनी आभार मानले आहेत
योगेश संजय पवार यांचा १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता झालेल्या अपघातात मेंदु ला जबर मार लागल्यामुळे त्यांना नसिक येथील सोपान रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्यांची परीस्थिती साधारण असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुंटुंब करु शकत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळावा म्हणून मंत्रालयात फाईल दाखल केली होती मात्र त्यात उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे फाईल निधीवाचुन प्रलंबित होती.याबाबत टाकळी प्र दे चे एकनाथ पवार यांनी ही बाब रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश  पवार यांना सांगितल्याने नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे  यांना असलेली अडचण लक्षात आणून दिल्याने त्यांनी तहसील कार्यालयास दिपावलीची सुट्टी असताना रुग्णालयाच्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असल्याने लागलीच नायब तहसीलदार धनराळे यांनी दाखला उपलब्ध करून दिल्याने जनतेसाठी तत्परतेने प्रशासनाचे अधिकारी आपली तत्परता दाखवत असल्याचे समाधान एकनाथ पवार यांनी व्यक्त केले,यावेळी शिरसगावचे दिलीप पाटील,रोहित शिंपी उपस्थित होते,

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button