विशाल नेवे यांना कृषि उद्योजक पुरस्कार प्रदान!

विशाल नेवे यांना कृषि उद्योजक पुरस्कार प्रदान!
जळगाव दि.13 – सप्तरंग मराठी व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था आयोजित खान्देश ऑफ दि इयर पुरस्कार सोहळ्यात विशाल नेवे यांना कृषि उद्योजक पुरस्कार मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते देण्यातआला. खान्देशातील विविध भागात विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 25 व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विधितज्ज्ञ ॲड संजय राणे,कॅन्सर तज्ञ् व चांडक कॅन्सर हॉस्पिटल चे संचालक डॉ निलेश चांडक,धनाजी नाना विद्या प्रबोधनीचे डॉ पी आर चौधरी यांची विशेष उपस्थिती होती . सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.
विशाल नेवे यांनी शेतकऱ्यांचे सुंदर भविष्य व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबुत करण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर कृषी प्रोडुसर कंपनी ची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे वाटप उत्पादनात वाढ होईल या संदर्भात नियोजन व उत्पादनावरील खर्च कमी कसा करता येईल त्या संदर्भात मार्गदर्शन हे नेहमीच चालू असते.
शेतकरी उद्योजक व गुंतवणूकदार व्हावा. आपल्या राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर होऊन शेतकरी उद्योजकता वाढावी
यासाठी ते नेहमी प्रयत्नशिल आहे.



