मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्षपदी एस के अण्णा पाटील यांची एकमताने निवड !

मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्षपदी एस के अण्णा पाटील यांची एकमताने निवड
पाचोरा, 23 ऑक्टोबर 2023: मराठा सेवा संघाच्या (पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि पारोळा विभागाच्या) जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवश्री एस. के. अण्णा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारकात आज (23 ऑक्टोबर) त्यांच्या या निवडीबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मराठा सेवा संघाचे तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास पाटील, म.सेवा संघाचे संघटक सेक्रेटरी राहुल बोरसे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष एस ए पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील, अखिल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, कार्याध्यक्ष तथा आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, सचिव संजय पाटील, जनार्दन पाटील, बाबाजी पाटील, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मुकेश तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना अण्णा पाटील म्हणाले की, “मला मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या पदाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
एस के आण्णा पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तसेच ते न्यूज झेप इंडिया चे पाचोरा प्रतिनिधी काम करीत आहेत व याआधी त्यांनी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे .



