पाचोरा तालुक्याचे माजी आमदार ओंकार वाघ यांच्या स्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळा !

पाचोरा तालुक्याचे माजी आमदार ओंकार वाघ यांच्या स्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळा
पाचोरा, 8 ऑक्टोबर 2023: पाचोरा तालुक्याचे माजी आमदार व सामाजिक चळवळीचे लोकनेते स्वर्गीय माननीय श्री ओंकार आप्पा नारायण वाघ यांच्या स्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळवार रात्री 8 वाजता राजे संभाजी महाराज चौक येथे प्रसिद्ध युवा कीर्तनकार तसेच झी टॉकीज गजर भक्तीचा या टीव्ही चॅनलच्या प्रसिद्ध असलेल्या ह. भ. प. कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे भव्य कीर्तनाचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
या कीर्तन सोहळ्याचे आयोजन पाचोरा तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार दिलीप भाऊ वाघ व पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ यांनी केले आहे.
या कीर्तन सोहळ्यात तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



