वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याकडून गणपती बाप्पाला निरोप

सौ वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याकडून गणपती बाप्पाला निरोप
पाचोरा: येथे गणपती बाप्पा दहा दिवस विराजमान होऊन आज आपल्यातून निरोप घेतला. पूर्ण शहर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयजयकार सह या समारंभात सहभागी झाले.शहरातले सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन उत्साहत पार पाडले. याप्रसंगी वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याकडून शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे श्री गणेश बाप्पाचे दर्शन करून पाचोर्यातले सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे मनापासून हार्दिक स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. संपूर्ण नागरिकांनी गणपती बाप्पा यांना अति उत्साहात निरोप दिला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव भाऊ मराठे, शहर प्रमुख अनिल सावंत, माझी शहराध्यक्ष भरत भाऊ खंडेलवाल, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, पप्पू जाधव, नितीन लोहार, हेमंत पाटील, मनोज चौधरी, हरीश देवरे, कैलास मिस्तरी, निलेश पारोचे, धरम काका व शुभम पाटील सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि श्रेष्ठ व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



