
पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर (शिंदे गट) शिवसेना-भाजपची सत्ता !
आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश पाटील यांनी सभापती पदी तर प्रकाश पाटील यांनी उपसभापती पदभार स्वीकारला.
तर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, उबाठा सेनेच्या नेत्या वैशालिताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबाळ नसल्याने म्हणजे ७-९ असल्यामुळे त्यांनी सभापती, उपसभापती पदावर दावा न करता निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नाही. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत स्वतंत्र पॅनल मधून केवळ दोन जागेवर निवडून आलेले संचालक गैरहजर राहिल्याने पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त सभापती, उपसभापतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.या सर्व खेळीत शिवसेना शिंदे गटाने पाचोरा शिंदेचा राजकीय गेम केल्याचे दिसत आहेत! . त्यामुळेच ते तटस्थ राहिले कि आपल्यावर झालेल्या आरोपाला अजून चालना मिळू नये म्हणून तटस्थ राहिले हा सध्या तरी चर्चेचा विषय झाला आहे . त्यामुळे येणा-या काळात कोण जागा विकू देतो व कोण जागा घेतो . याकडेही शेतकरी बांधवांनी लक्ष्य देण्याची वेळ राहणार आहे . म्हणजे सर्वात मोठी बाजार समिती जागा वाचविण्याचे प्रयत्न केले पाहिजे.



