खान्देश

शहीद जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

शहीद जवान विनोद पाटील यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

धरणगाव, दि. २० नोव्हेंबर २०२३

भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (वय ३९) यांचा शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी रोटवद, ता. धरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिबाऊ पाटील, रोटवद सरपंच सुदर्शन पाटील, पोलीस पाटील नरेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य यांनी मुखाग्नी दिला.

शहीद जवान विनोद पाटील यांच्या पराक्रमामुळे त्यांना देशातल्या सर्व नागरिकांनी अभिवादन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button