
शासन आपल्या दारी कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे – आ. किशोर पाटील
पाचोरा (प्रतिनिधी) – शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातृन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सह १० ते १२ मंत्री मतदारसंघात येत आहे. राज्यात तालुका स्तरावरचा पहिलाच कार्यक्रम घेण्याचा पहिला मान आपल्याला मिळालेला आहे .तर १२ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री बहुमान आपल्याला मिळाला आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे कडे मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी करणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रम दोन वेळा काही कारणास्तव पुढे करावा लागला. १२ सप्टेंबरला कार्यक्रम निश्चित झाला आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रसंगी
,
जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, पदमसिंग पाटील, भय्या पाटील, किशोर बारवकर, राजेंद्र पाटील, तसेच भुराप्पा आदी उपस्थित होते. शासन आपल्या दारी कार्यक्रम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ना. अजित पवार यांच्यासह १० ते १२ मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मतदारसंघातील जनतेला कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा, विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे, दाखले लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यावेळी भडगाव तालुक्यात होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, तालुक्यात होऊ घातलेली औद्योगिक वसाहत,
भडगाव शहरासाठीच्या सव्वा कोटींची पेयजल योजना ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय यासह अनेक विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे.
भडगाव तालुक्यात आरटीओ उपप्रादेशिक कार्यालय, आदिवासी विकास मंडळाचे उपविभागिय कार्यालय, गिरणेवरील बलून बंधारे, के. टी. वेअर बंधारे, हातनूर धरणाचे वाहून जाणारे पाणी पाटणादेवीपर्यंत वळविण्याचे प्रकल्प अशा विविध योजनांची गरज आहे, अशी अनेक प्रलंबित कामे करून घेण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी मतदारसंघातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.



