क्राईमखान्देश

आंदोलनादरम्यान भडगावातील ‘त्या’ पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा फोन! अन आरोपीला कठोर शिक्षा होईल दिला शब्द कुटुंबियांचे अश्रू अनावर !

आंदोलनादरम्यान भडगावातील ‘त्या’ पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा फोन! अन आरोपीला कठोर शिक्षा होईल दिला शब्द कुटुंबियांचे अश्रू अनावर !

भडगाव ।तालुक्यातील एका गावात सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या

घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. तर पाचोरा भडगाव तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही आज अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित केला. आणि संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या कुटुबींयांशी संपर्क साधला.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?
विधानसभेच्या अविधेशनात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आरोपीला अटक झाली आहे. तो सुटणार नाही, यासाठी व्यवस्था आपण केली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सारखा चांगला वकील देवू. यामध्ये त्यावर कठोर कारवाई होईल. एकदम कडक कारवाई होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आश्वासन दिलं.

यावेळी पीडित मुलीच्या काकूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना रोष व्यक्त केला. तुम्ही कधी वकील लावणार, कधी कारवाई करणार, त्यापेक्षा संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचं काय करायचं बघून घेवू, असं त्या म्हणाल्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोरात शिक्षा होईल, असं आश्वासन दिलं.

यावेळी हजारोच्या संख्येने जन समुदाय उसळला होता. घटनेचे गांभीर्य बघता अनेकांचे अश्रू अनावर होते . मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हि ठेवण्यात आला होता.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button