आमडदे येथे व्यायाम शाळेत साहित्य पुरवण्याची पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भोसले यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी !

आमडदे येथे व्यायाम शाळेत साहित्य पुरवण्याची पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भोसले यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी !
भडगाव -प्रतिनिधि- ( संजय शेवाळे)-भडगाव तालुक्यातील आमडदे येथे व्यायाम शाळेत साहित्य पुरवण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती श्री प्रमोद भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. भडगाव शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर असलेल्या आमडदा येथे ग्रामपंचायत मार्फत व्यायाम शाळा बांधली असून त्या या विषयासाठी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील तरुण मुलं व्यायाम करण्यासाठी येत असतात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे तरुणांनी व्यायाम करावे शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी नेहमी व्यायामावर योगावर मार्गदर्शन करीत असतात त्यासाठी तरुण वर्ग यांनी व्यायाम करावे तसेच या व्यायामासाठी लागणारे साहित्य नसून शासनाने त्वरित लक्ष देऊन तरुण वर्गाला व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे यासाठी भडगाव तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती प्रमोद भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना अशा आशयाचे निवेदनाद्वारे केली . यावेळी निवेदन देताना प्रमोद भोसले यांच्यासोबत तरुण कार्यकर्ते व शहरातील तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.



